09 January 2007

उत्तरायण Uttarayan

उत्तरायण हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर सर्व प्रथम सीडी-डीविडी आणून तो पहा! अनेक जणांस माहित नसेल की बिपीन नाडकर्णी दिग्दर्शीत हा चित्रपट (भारताची अधिकृत ''एंट्री'' म्हणून) ऑस्करच्या शर्यतीत होता. पण आपली देशाची एकूणच सर्व system किती सदोष आहे ह्याचं ठळक उदाहरण म्हणजे उत्तरायण सोडून अत्यंत चुकार असा 'पहेली'' हा चित्रपट ऑस्करला पाठविला गेला (आणि अर्थातच आपटला). त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे अमोल पालेकरांनी त्या फालतू हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. असो. उत्तरायण सारखा सर्वांग-सुंदर चित्रपट अजिबात चुकवू नये असा आहे.
उत्तरायण चित्रपट जयवंत दळवींच्या ''दुर्गी'' या कथेवर आधारीत आहे. चित्रपटांच्या सुरुवातीचे १९६०च्या पुण्याचे वातावरण बघून मला आजकालच्या ग्लोबलाईझेशनच्या धावपळीचा कंटाळा आला. चित्रपटांच्या सुरुवातीचे सुमधुर संगीत मनाला वेड लावते. उत्तरायणच्या संहितेबरोबरच संगीत हे या चित्रपटाचा plus point आहे. कुठल्याशा मराठी चॅनलवर उत्तरायणचे मेकिंग दाखवित असताना ह्या gifted संगीतकाराची ओळख झाली. (ह्या मेकिंगच्या वेळीस दिग्दर्शकांनी एकही मराठी शब्द उच्चारला नाही). सगळीच्या सगळी गाणी श्रवणीय आहेत. गाणी कुलटोड या साईटवर उपलब्ध आहेत.


नीना कुलकर्णी आणि शिवाजी साटम ह्यांनी उत्तम काम केलंय. पण मला विशेष आवडलेले चेहरे म्हणजे तरुण नीना कुलकर्णीची भुमिका करणारी अभिनेत्री (जी आता बेटियाँ अपनी या पराया धन नामक रटाळ मालिकेत काम करते) आणी शिवाजी साटम ह्यांच्या सुनेची भुमिका करणारी (उन-पाउस मधील प्रिया). त्याच बरोबर blink and miss अश्या एकाच सीन मध्ये असलेली प्रियाची मैत्रीण सुध्दा सुरेख दिसते!

हिंदीतील बंडल लव-स्टोरीज पेक्षा उत्तरायण ही mature लव स्टोरी सर्वांना भावेल अशीच आहे. त्यामुळे हा चित्रपट पहाच आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला ते!
जाता जाता मला वेड लावणार्या उत्तरायणातील एका गाण्याच्या काही ओळी-
धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना..
वाऱ्यासंगे वाहता त्या पुलापाशी थांबना..
रमुनी साऱ्या या जगार रिक्त व्हावसे परी..
तैसे गुंफू गीत हे....

No comments: