मच्छिंद्र चाटे ह्याच्या 'बिनधास्त' ह्या मराठी चित्रपटाच्या हिंदी रीमेक फ्रेंडशिप (Friendship) च्या पानभर जाहिराती मराठी वृत्तपत्रात दिसत आहेत. बिनधास्त हा मराठी चित्रपट उत्तम जमला होता. चाटे त्याचा हिंदी रिमेक बनवत आहेत ही चांगली गोष्ट आहे पण त्यांचा सर्व भर मराठी वृत्तपत्रात/प्रसारमाध्यमांत जाहिराती देण्यात आहे. मराठी माणसांनी original मराठी चित्रपट पाहिला आहे. ते का म्हणून पुन्हा तोच चित्रपट हिंदीत बघतील? परत त्यांच्या जाहिराती देखिल unconventional आणि बऱयाच प्रमाणात हास्यास्पद आहेत. चित्रपटाची जाहिरात हा लेख नसतो. तो जर मराठी असता तर आम्ही त्या भावनीक आवाहनाला प्रतिसाद दिला असता. जाहिरातींचा एकूण सुर म्हणजे "मायमराठीच्या प्रेक्षकहो, मी एक हिंदी चित्रपट बनवून एक महान आणि अविश्वसनीय काम केले आहे,तर आपण त्याला साथ द्या''. जणू काही हिंदी भाषेत चित्रपट बनवणे ही एक अभिमानास्पद बाब आहे. यालाच म्हणतात मराठी माणसाचा न्युनगंड. एक तर त्यांनी हिंदी चित्रपट बनवला असेल तर तो एकत्रीत पणे भारतभर रिलीज करायला हवा होता. आधी महाराष्ट्रात व मग उर्वरीत भारतात असं का?
मला तर हिंदी वा हिंदी चित्रपटाचे अजिबात कौतुक नाहीये. हिंदी चित्रपट फुकट केबलवर पहावयास मिळाले तर बघावे आणि आपले पैसे फक्त मराठी चित्रपटांवर खर्च करावा. तशीही हिंदी चित्रपटांची थिएटर/मल्टिप्लेक्स मध्ये पैसे खर्चून बघण्याची लायकी नसते.
असो, चाटेंना आवाहन. हिंदीत चित्रपट बनवलात चांगली गोष्ट आहे. त्याचं मराठी वृतपत्रात कौतुक करवून घेऊ नका. हिंदी भाषा वा हिंदी चित्रपट म्हणजे काय महान,स्वर्गीय व तत्सम नाही. तुमच्या चित्रपटाला भरघोस यश व पैसा मिळो. व तो तुम्ही जेव्हा मराठी चित्रपटांत लावाल तेव्हा आम्ही नकीच मल्टिप्लेक्स मध्ये बघायला येऊ.
13 January 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
अगदी बरोबर!!
when will such old fashioned people like chate- the power freaks improve and think beyond very limited group. I sometime feel that our people do not want to progress and we are much into narrow-mental-frame!!
see my blog for one more such recent posting
धन्यवाद
विलंबाबद्दल क्षमस्व. मी आपला ब्लॉग पाहत आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
Post a Comment