नव्या मराठी चित्रपटांतील गाणी आता मराठी रसिकांच्याच ओठावर रेंगाळत नाहीत. त्यामुळे
त्यांचे संगीताचे हक्कही विकले जात नाहीत. मराठी चित्रपटसंगीताच्या दुर्दैवाचे असे दशावतार
सुरू असताना आगामी 'घरकुल' या सत्यजीत कुलकणीर् दिग्दशिर्त चित्रपटासाठी तब्बल १२
गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत अन् विशेष म्हणजे, हिंदीतल्या आघाडीच्या गायक-गायिकांनी
ती गायली आहेत. सुनिधी चौहान, कुमार सानू, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन, आलिशा
चिनॉय, सुखविंदर, साधना सरगम, कुणाल गांजावाला, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, वैशाली
सामंत असा ख्यातकीर्त गायकांचा फौजफाटा एका मराठी सिनेमात एकत्र येण्याचा हा पहिलाच
योग आहे.
' घरकुल'साठी प्रवीण दवणे यांची गाणी अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केली आहेत. सुदेश
भोसले यांचा मुलगा सिद्धांत भोसले आणि अमृता खाडिलकर-नातू यांनीही या सिनेमाची गाणी
गायली आहेत. या सिनेमाची गाणी रेकॉर्ड करण्यासाठी सुमारे २०-२२ लाख रुपये खचिर्ले गेले
आहेत. एवढ्या बजेटमध्ये अख्खा मराठी चित्रपट बनवतात काही निर्माते-दिग्दर्शक. 'घरकुल'चं
वैशिष्ट्य इथेच संपत नाही. हा मराठीतला खऱ्या अर्थानं मल्टिस्टारर सिनेमा आहे. यात तब्बल
२८ प्रमुख कलावंत काम करताहेत. दुय्यम भूमिकांमध्येही २२ ते २५ कलावंत असतील या फिल्मचे
चित्रीकरण फेब्रुवारी महिन्यात होणार असून रीतसर कास्टिंग सुरू झाले आहे.
निर्माता-दिग्दर्शक सत्यजीत कुलकणीर् म्हणाले की, 'घरकुल' हे माझं स्वप्न आहे आणि त्यामुळे
आथिर्क गणितांचा विचार फारसा केलेला नाही. कुठेही तडजोड करून दुसऱ्या ठिकाणी वायफळ
खर्च करण्याचा अति'शहाणपणा' केलेला नाही. त्यामुळे इतक्या गुणीजनांनी माझ्या फिल्ममध्ये
गाणी गाऊन खरंच तिला चार चाँद लावले आहेत.
' घरकुल'मधील गाण्यांच्या आल्बमचा नजराणा जानेवारी महिन्यात रसिकांसाठी खुला होईल.
सध्या दहा गाणी रेकॉर्ड झाली आहेत. उर्वरित दोन गाणी येत्या २१ ते २३ डिसेंबर या
कालावधीत रेकॉर्र्ड होणार आहेत.
नॉन फिल्मी संगीतच लोकप्रिय
गेल्या काही वर्षांपासून मराठीमध्ये तुफान लोकप्रिय झाली ती गाणी बहुतांशी नॉन फिल्मी
होती. त्यामध्ये कोळीगीतं, लोकगीतं, रिमिक्स, लावण्यांचा भर होता. मराठी फिल्मी
गीतांना वाद्यवृंदांच्या गीतांनी पुनरुज्जीवित केले. भक्तिसंगीतानेही लाखो रुपयांची उलाढाल
केली. त्यासोबत नॉन फिल्मी गाण्यांमध्ये सुपरहिट अल्बम ठरण्याचा मान प्रामुख्याने 'मी
बाबूराव बोलतोय', 'रेतीवाला नवरा पाहिजे,' 'रसिकाच्या लग्नाला या' या गाण्यांनी
मिळवला. 'अगं बाई अरेच्चा', 'नवरा माझा नवसाचा' अशा काही निवडक सिनेमांमधील
गाण्यांनी अलीकडच्या काळात लोकप्रियतेचा ठसा उमटवला.
No comments:
Post a Comment