22 June 2007

सारेगमपची अंतिम फेरी पुण्यात Saregamapa grand finale in Pune

काही कारणांमुळे मी आयडिया सारेगमपचा सध्याचा 'सीजन' पूर्णपणे पाहू शकलो नाही, मध्येच काही भाग दृष्टीस पडायचे. हा सीजन मस्तच जमला असेल यात शंका नाही. त्यातल्या त्यात सुनिल बर्वे, सुमित राघवन व सीमा देशमुख यांची गाणी फार चांगली वाटली. मुख्य म्हणजे हा कार्यक्रम मार्गदर्शक व कलाकार-स्पर्धक सर्वांनीच गंभीरपणे घेतला होता व चांगलीच मेहनत केली होती. सीमा देशमुख फारच गोड दिसत होती कार्यक्रमात व तिने म्हटलेले 'माझ्या ????ने सोडलीया दारु' आपले फेवरिट. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे यश किंवा प्लस पॉईंट असा की नव्या पिढीला मराठी संगीताबद्दल आवड निर्माण होत आहे.

उद्या पुण्यात या कार्यक्रमाचा ग्रॅंड फिनाले अर्थात अंतिम फेरी रंगणार आहे. आशा आहे आधीच्या सारेगमपची अंतिम फेरी जशी मस्त जमली होती तशीच ही देखिल जमेल. अंतिम फेरीत आपले मत तर सुमितलाच आहे. असंच तुलना करत असतानाच मला हिंदी सारेगमपचा फोलपणा दिसून आला. माझ्या मते गजेंद्र सिंह सारेगमपच्या हिंदी वर्जन हास्यास्पद व मेलोड्रामाटिक करण्यात काही कसर सोडत नसतील! तईच गत अंताक्षरीची.एका भाग पाहत होतो तर उगाच हिमेश रेशमिया आशा भोसलेंशी वाद घालत होता, नंतरच्या भागात इस्माईल दरबार अजून कोणाच्या नावाने उखडला होता. स्टारवरच्या वॉईस ऑफ इंडियात अलका वि. अभिजीत वि. बप्पी वि. ललित असा सामना रंगला होता!! आपला कार्यक्रम लोकप्रिय करण्यासाठी हे लोक काय-काय करतील काही नेम नाही!

1 comment:

Anonymous said...

FYI

Sadhya Gajendra singh Amul Star Voice Of India cha direction kartaat...He has left Zee- Sa re ga ma pa.

Thanks
Ajit