Showing posts with label music. Show all posts
Showing posts with label music. Show all posts

25 February 2007

सारेगमप महागायक विजेता- अभिजीत कोसंबी Saregamapa winner Abhijeet Kosambi

काल आयडिया सारेगमपची महाअंतिम फेरी दिमाखात झाली. फक्त निकाल काय तो धक्कादायक होता. मंगेश बोरगांवकर किंवा अनघा ढोमसेंपैकी कोणी जिंकावे अशी माझी इच्छा होती पण जिंकला अभिजीत कोसंबी! खरं सांगायचं तर हा अभिजीत मला इतका चांगला गायक अजिबात वाटत नाही. महाअंतिम फेरीपर्यंत मजल मारली ते ठीक आहे पण अनघा व मंगेश ह्यांचं गाणं अत्यंत कानांना मधुर वाटतं. मला संगीतातले काही समजत नाही पण अभिजीतला 'मल्हार वारी' आणि सावरखेड-एक गाव मधले 'हे गाव माझे' या उत्तम गाण्यांची वाट लावताना मी ऐकले आहे! काल बाद झालेल्या स्पर्धकांनी सोहळ्याच्या सुरुवातीला म्हटलेले 'तु चाल पुडं तुला रं गड्या भीती कुनाची' हे गाणं सर्वात उत्तम होते.

असो, कालच्या सोहळ्यातील सर्वात चिड आणणारी गोष्ट म्हणजे जेव्हा अभिजीतला महागायक ची ट्रॉफी दिली गेली तेव्हा अशी घोषणा करण्यात आली की त्याला हिंदी सारेगमप मध्ये (म्हणजे Hero Honda Saregamapa!) 'डायरेक्ट' प्रवेश मिळाला आहे. हा म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. येथे विजयी होणारा स्पर्धक तावून-सुलाखून निघाला आहे. त्याने सारेगमपची परीक्षा पास केली आहे त्याला पुन्हा हिंदीतील त्याच स्पर्धेत का बसवता? काय हिंदी कार्यक्रमाचा दर्जा मराठीपेक्षा जास्त आहे? का हिंदी सारेगमप मध्ये भाग घेऊन त्याचे हात आकाशाला टेकणार आहेत? त्याला जर nationwide exposure द्यायचंय तर त्याला हिंदी अल्बम ऑफर करा ना. कमीत कमी मराठी अल्बम काढायलाच हवा. पण इथेच मराठी माणसांचं चुकतं! नेहमी हिंदीकडे का पाहता? हिंदी सारेगमप म्हणजे अत्यंत हास्यास्पद कार्यक्रम आहे. घडवून आणलेल्या controversies, परिक्षकांमधील फालतू व बाष्फळ वाद इत्यादीं मुळे TRP वाढवणे इतकाचं यांचा उद्योग आहे. सारेगमप, लिटील चॅम्प्स आणि नंतर एक मै और एक तु इत्यादी रटाळ कार्यक्रमात भाग घेणं हे महागायकाला नक्कीच शोभणारं नाही.मराठी दहावी पास झालेल्या मुलाला परत हिंदीच्या पहिल्या इयत्तेत का बसवता?

09 January 2007

उत्तरायण Uttarayan

उत्तरायण हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर सर्व प्रथम सीडी-डीविडी आणून तो पहा! अनेक जणांस माहित नसेल की बिपीन नाडकर्णी दिग्दर्शीत हा चित्रपट (भारताची अधिकृत ''एंट्री'' म्हणून) ऑस्करच्या शर्यतीत होता. पण आपली देशाची एकूणच सर्व system किती सदोष आहे ह्याचं ठळक उदाहरण म्हणजे उत्तरायण सोडून अत्यंत चुकार असा 'पहेली'' हा चित्रपट ऑस्करला पाठविला गेला (आणि अर्थातच आपटला). त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे अमोल पालेकरांनी त्या फालतू हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. असो. उत्तरायण सारखा सर्वांग-सुंदर चित्रपट अजिबात चुकवू नये असा आहे.
उत्तरायण चित्रपट जयवंत दळवींच्या ''दुर्गी'' या कथेवर आधारीत आहे. चित्रपटांच्या सुरुवातीचे १९६०च्या पुण्याचे वातावरण बघून मला आजकालच्या ग्लोबलाईझेशनच्या धावपळीचा कंटाळा आला. चित्रपटांच्या सुरुवातीचे सुमधुर संगीत मनाला वेड लावते. उत्तरायणच्या संहितेबरोबरच संगीत हे या चित्रपटाचा plus point आहे. कुठल्याशा मराठी चॅनलवर उत्तरायणचे मेकिंग दाखवित असताना ह्या gifted संगीतकाराची ओळख झाली. (ह्या मेकिंगच्या वेळीस दिग्दर्शकांनी एकही मराठी शब्द उच्चारला नाही). सगळीच्या सगळी गाणी श्रवणीय आहेत. गाणी कुलटोड या साईटवर उपलब्ध आहेत.


नीना कुलकर्णी आणि शिवाजी साटम ह्यांनी उत्तम काम केलंय. पण मला विशेष आवडलेले चेहरे म्हणजे तरुण नीना कुलकर्णीची भुमिका करणारी अभिनेत्री (जी आता बेटियाँ अपनी या पराया धन नामक रटाळ मालिकेत काम करते) आणी शिवाजी साटम ह्यांच्या सुनेची भुमिका करणारी (उन-पाउस मधील प्रिया). त्याच बरोबर blink and miss अश्या एकाच सीन मध्ये असलेली प्रियाची मैत्रीण सुध्दा सुरेख दिसते!

हिंदीतील बंडल लव-स्टोरीज पेक्षा उत्तरायण ही mature लव स्टोरी सर्वांना भावेल अशीच आहे. त्यामुळे हा चित्रपट पहाच आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला ते!
जाता जाता मला वेड लावणार्या उत्तरायणातील एका गाण्याच्या काही ओळी-
धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना..
वाऱ्यासंगे वाहता त्या पुलापाशी थांबना..
रमुनी साऱ्या या जगार रिक्त व्हावसे परी..
तैसे गुंफू गीत हे....

08 January 2007

Marathi music मराठी संगीताला चांगले दिवस

हिंदी गाण्यांच्या बारा महिने तेरा काळ दिवसाचे चोवीस तास सुरू असलेल्या भडिमारामुळे
नव्या मराठी चित्रपटांतील गाणी आता मराठी रसिकांच्याच ओठावर रेंगाळत नाहीत. त्यामुळे
त्यांचे संगीताचे हक्कही विकले जात नाहीत. मराठी चित्रपटसंगीताच्या दुर्दैवाचे असे दशावतार
सुरू असताना आगामी 'घरकुल' या सत्यजीत कुलकणीर् दिग्दशिर्त चित्रपटासाठी तब्बल १२
गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत अन् विशेष म्हणजे, हिंदीतल्या आघाडीच्या गायक-गायिकांनी
ती गायली आहेत. सुनिधी चौहान, कुमार सानू, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन, आलिशा
चिनॉय, सुखविंदर, साधना सरगम, कुणाल गांजावाला, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, वैशाली
सामंत असा ख्यातकीर्त गायकांचा फौजफाटा एका मराठी सिनेमात एकत्र येण्याचा हा पहिलाच
योग आहे.

' घरकुल'साठी प्रवीण दवणे यांची गाणी अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केली आहेत. सुदेश
भोसले यांचा मुलगा सिद्धांत भोसले आणि अमृता खाडिलकर-नातू यांनीही या सिनेमाची गाणी
गायली आहेत. या सिनेमाची गाणी रेकॉर्ड करण्यासाठी सुमारे २०-२२ लाख रुपये खचिर्ले गेले
आहेत. एवढ्या बजेटमध्ये अख्खा मराठी चित्रपट बनवतात काही निर्माते-दिग्दर्शक. 'घरकुल'चं
वैशिष्ट्य इथेच संपत नाही. हा मराठीतला खऱ्या अर्थानं मल्टिस्टारर सिनेमा आहे. यात तब्बल
२८ प्रमुख कलावंत काम करताहेत. दुय्यम भूमिकांमध्येही २२ ते २५ कलावंत असतील या फिल्मचे
चित्रीकरण फेब्रुवारी महिन्यात होणार असून रीतसर कास्टिंग सुरू झाले आहे.

निर्माता-दिग्दर्शक सत्यजीत कुलकणीर् म्हणाले की, 'घरकुल' हे माझं स्वप्न आहे आणि त्यामुळे
आथिर्क गणितांचा विचार फारसा केलेला नाही. कुठेही तडजोड करून दुसऱ्या ठिकाणी वायफळ
खर्च करण्याचा अति'शहाणपणा' केलेला नाही. त्यामुळे इतक्या गुणीजनांनी माझ्या फिल्ममध्ये
गाणी गाऊन खरंच तिला चार चाँद लावले आहेत.

' घरकुल'मधील गाण्यांच्या आल्बमचा नजराणा जानेवारी महिन्यात रसिकांसाठी खुला होईल.
सध्या दहा गाणी रेकॉर्ड झाली आहेत. उर्वरित दोन गाणी येत्या २१ ते २३ डिसेंबर या
कालावधीत रेकॉर्र्ड होणार आहेत.

नॉन फिल्मी संगीतच लोकप्रिय

गेल्या काही वर्षांपासून मराठीमध्ये तुफान लोकप्रिय झाली ती गाणी बहुतांशी नॉन फिल्मी
होती. त्यामध्ये कोळीगीतं, लोकगीतं, रिमिक्स, लावण्यांचा भर होता. मराठी फिल्मी
गीतांना वाद्यवृंदांच्या गीतांनी पुनरुज्जीवित केले. भक्तिसंगीतानेही लाखो रुपयांची उलाढाल
केली. त्यासोबत नॉन फिल्मी गाण्यांमध्ये सुपरहिट अल्बम ठरण्याचा मान प्रामुख्याने 'मी
बाबूराव बोलतोय', 'रेतीवाला नवरा पाहिजे,' 'रसिकाच्या लग्नाला या' या गाण्यांनी
मिळवला. 'अगं बाई अरेच्चा', 'नवरा माझा नवसाचा' अशा काही निवडक सिनेमांमधील
गाण्यांनी अलीकडच्या काळात लोकप्रियतेचा ठसा उमटवला.

05 January 2007

मराठी चित्र संगीत Marathi film music

श्वास नंतर मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले. आचार्य अत्र्यांच्या ''श्यामची आई'' ह्या
राष्ट्रपती पदक मिळवलेल्या पहिल्या चित्रपटानंतर कुठल्याही मराठी चित्राला हे पदक
मिळाले नाही. पन्नास वर्षाच्या gap नंतर संदीप सावंत यांनी राष्ट्रपती पदक तर मिळवलेच
पण ऑस्करला जाण्याचा मान देखिल पटकावला. भारताच्या वतीने नेहमीच so-called
राष्ट्रभाषा हिंदी चे अत्यंत चुकार चित्रपट पाठवले जातात. सुदैवाने मराठी माणूस ऑस्करच्या
स्पर्धेत नेहमीच लकी ठरला आहे. मग ते संदीप सावंत असो वा आशुतोष गोवारीकर, अमोल
पालेकर असो अथवा भानु अथैया. असो सांगण्याचा मुद्दा हा की ऑस्करला पाठविला गेलेला
पहिला so-called प्रादेशिक चित्रपट म्हणजे 'श्वास'.
गोल गोल फिरुन मुळ मुद्द्यावर येतो. श्वास ने मराठी चित्रपटसृष्टीत श्वास ओतला आणि नवीन
विषयांचे दर्जेदार चित्रपट निर्माण होऊ लागले. मराठी प्रेक्षक सुध्दा गर्दी करु लागले.
केदार शिंदे गजेंद्र अहिरे स्मिता तळवलकर संजय सूरकर भरत जाधव महेश कोठारे ही मंडळी नव्या
दमाच्या मराठी चित्रपटसृष्टीत चमकू लागले आहेत. पण माझा मुद्दा पुन्हा तो नाही आहे. मला
सांगायचे होते नव्या मराठी चित्रसंगीताबद्दल. मराठी चित्राने कात टाकली तशीच मराठी
चित्रसंगीतानेही. मला या लाटेतील आवडलेले चित्रपट संगीत- 'भेट' (दि-चंद्रकांत कुलकर्णी),
अगं बाई अरेच्चा, उत्तरायण, जत्रा, यंदा कर्तव्य आहे, सरीवर सरी, सातच्या आत घरात. या
बद्दल विस्ताराने लिहिन पण आत खरच मुळ मुद्द्यावर येतो. आपल्याला मराठी संगीत उतरुन
(डाऊनलोड) करायचे असल्यास खालील साईट पहा- आपल्याकडे काही मराठी गाणी असल्यास
आपण देखिल या साईट मार्फत इतरांशी शेयर करु शकता.
http://music.cooltoad.com/music/category.php?id=10330

For new Marathi film music plz see above website. If u cant read Marathi
u need to enable Marathi on ur computer. To write in Marathi see

http://baraha.com