13 January 2007

'बिनधास्त' आत हिंदीत- Friendship

मच्छिंद्र चाटे ह्याच्या 'बिनधास्त' ह्या मराठी चित्रपटाच्या हिंदी रीमेक फ्रेंडशिप (Friendship) च्या पानभर जाहिराती मराठी वृत्तपत्रात दिसत आहेत. बिनधास्त हा मराठी चित्रपट उत्तम जमला होता. चाटे त्याचा हिंदी रिमेक बनवत आहेत ही चांगली गोष्ट आहे पण त्यांचा सर्व भर मराठी वृत्तपत्रात/प्रसारमाध्यमांत जाहिराती देण्यात आहे. मराठी माणसांनी original मराठी चित्रपट पाहिला आहे. ते का म्हणून पुन्हा तोच चित्रपट हिंदीत बघतील? परत त्यांच्या जाहिराती देखिल unconventional आणि बऱयाच प्रमाणात हास्यास्पद आहेत. चित्रपटाची जाहिरात हा लेख नसतो. तो जर मराठी असता तर आम्ही त्या भावनीक आवाहनाला प्रतिसाद दिला असता. जाहिरातींचा एकूण सुर म्हणजे "मायमराठीच्या प्रेक्षकहो, मी एक हिंदी चित्रपट बनवून एक महान आणि अविश्वसनीय काम केले आहे,तर आपण त्याला साथ द्या''. जणू काही हिंदी भाषेत चित्रपट बनवणे ही एक अभिमानास्पद बाब आहे. यालाच म्हणतात मराठी माणसाचा न्युनगंड. एक तर त्यांनी हिंदी चित्रपट बनवला असेल तर तो एकत्रीत पणे भारतभर रिलीज करायला हवा होता. आधी महाराष्ट्रात व मग उर्वरीत भारतात असं का?

मला तर हिंदी वा हिंदी चित्रपटाचे अजिबात कौतुक नाहीये. हिंदी चित्रपट फुकट केबलवर पहावयास मिळाले तर बघावे आणि आपले पैसे फक्त मराठी चित्रपटांवर खर्च करावा. तशीही हिंदी चित्रपटांची थिएटर/मल्टिप्लेक्स मध्ये पैसे खर्चून बघण्याची लायकी नसते.

असो, चाटेंना आवाहन. हिंदीत चित्रपट बनवलात चांगली गोष्ट आहे. त्याचं मराठी वृतपत्रात कौतुक करवून घेऊ नका. हिंदी भाषा वा हिंदी चित्रपट म्हणजे काय महान,स्वर्गीय व तत्सम नाही. तुमच्या चित्रपटाला भरघोस यश व पैसा मिळो. व तो तुम्ही जेव्हा मराठी चित्रपटांत लावाल तेव्हा आम्ही नकीच मल्टिप्लेक्स मध्ये बघायला येऊ.

11 January 2007

सा रे ग म प Sa re ga ma pa


परवा झी मराठी वरचे सारेगमप पाहिले. आमच्या घरी ई.टी.वी चे जास्त प्रस्थ असल्यामुळे मला झी मराठीवरच्या कार्यक्रमांची जास्त माहिती नव्हती. ३१ डिसेंबरच्या एका कार्यक्रमात सारेगमपची मंडळी औरंगाबादेत गात होती. (अगं बाई अरेच्चा मधील 'मल्हार वारी' या झकास गाण्याची वाट लावत होती!) पण नंतरची दादा कोंडक्यांची गाणी ठीक म्हटली. तेव्हापासून मला सारेगमप माहित झाले आणि मराठीत reality show चालू असल्याचे समाधान वाटले.

परवा प्रथमच पूर्ण भाग पाहिला. नव्या गाण्यांचा विशेष भाग होता. महेश मांजरेकर (भयानक चेहरा आणि तोडकं मराठी बोलत होता. हिंदीत गेल्यावर यांचे चालढंग, कपडे आणि केसं सगळंच बदलत!) विशेष अतिथी होता. बहुतेक स्पर्धकांनी चांगली गाणी म्हटली. BTW माझी फ़ेवरेट मुंबईची आनंदी जोशी आहे. तिचा चेहरा आणि आवाज खूप आवडला! आनंदी ने अवधूत गुप्ते याचे गाणे म्हटले. मी कधी ऐकले नव्हते पण हा माणूस चांगला संगीतकार आहे. इतर काही स्पर्धकांनी सुध्दा त्याची गाणी म्हटली. कोल्हापूरच्या अभिजीत कोसंबीने 'वाऱ्यावरती रंग पसरले..' ह्या सुंदर गाण्याची वाट लावली.

पण सगळ्यात कमाल केली ते अनघा आणी मंगेश बोरगावकरानी. अनघाने कोणतं गांण म्हटल ते आठवत नाही पण मंगेशनी श्रीरंग गोडबोले लिखीत आणि अजय-अतुलचे संगीत असलेले 'महाराष्ट्र-गीत' म्हटले. ते त्यानी इतके जोशात गायले की अवधुतने म्हटल्याप्रमाणे अंगावर काटा उभा राहिला. सिंगर ऑफ द डे चा मान अर्थातच त्याला मिळाला. मी आता सारेगमपचे पुन:प्रक्षेपण कधी होतंय त्यावर नजर ठेवुन आहे. मला त्याचे गाणे रेकॉर्ड करायचं आहे. असो तुम्ही वोट देत आहात ना? या वेळेसचे माझे मत आनंदीला दिलं (आयडीया कंपनी चोर आहे,तीन रुपये पडतात एका smsला!) म्हणून मंगेशला वोट bsnl वरुन देणार आहे!

09 January 2007

उत्तरायण Uttarayan

उत्तरायण हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर सर्व प्रथम सीडी-डीविडी आणून तो पहा! अनेक जणांस माहित नसेल की बिपीन नाडकर्णी दिग्दर्शीत हा चित्रपट (भारताची अधिकृत ''एंट्री'' म्हणून) ऑस्करच्या शर्यतीत होता. पण आपली देशाची एकूणच सर्व system किती सदोष आहे ह्याचं ठळक उदाहरण म्हणजे उत्तरायण सोडून अत्यंत चुकार असा 'पहेली'' हा चित्रपट ऑस्करला पाठविला गेला (आणि अर्थातच आपटला). त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे अमोल पालेकरांनी त्या फालतू हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. असो. उत्तरायण सारखा सर्वांग-सुंदर चित्रपट अजिबात चुकवू नये असा आहे.
उत्तरायण चित्रपट जयवंत दळवींच्या ''दुर्गी'' या कथेवर आधारीत आहे. चित्रपटांच्या सुरुवातीचे १९६०च्या पुण्याचे वातावरण बघून मला आजकालच्या ग्लोबलाईझेशनच्या धावपळीचा कंटाळा आला. चित्रपटांच्या सुरुवातीचे सुमधुर संगीत मनाला वेड लावते. उत्तरायणच्या संहितेबरोबरच संगीत हे या चित्रपटाचा plus point आहे. कुठल्याशा मराठी चॅनलवर उत्तरायणचे मेकिंग दाखवित असताना ह्या gifted संगीतकाराची ओळख झाली. (ह्या मेकिंगच्या वेळीस दिग्दर्शकांनी एकही मराठी शब्द उच्चारला नाही). सगळीच्या सगळी गाणी श्रवणीय आहेत. गाणी कुलटोड या साईटवर उपलब्ध आहेत.


नीना कुलकर्णी आणि शिवाजी साटम ह्यांनी उत्तम काम केलंय. पण मला विशेष आवडलेले चेहरे म्हणजे तरुण नीना कुलकर्णीची भुमिका करणारी अभिनेत्री (जी आता बेटियाँ अपनी या पराया धन नामक रटाळ मालिकेत काम करते) आणी शिवाजी साटम ह्यांच्या सुनेची भुमिका करणारी (उन-पाउस मधील प्रिया). त्याच बरोबर blink and miss अश्या एकाच सीन मध्ये असलेली प्रियाची मैत्रीण सुध्दा सुरेख दिसते!

हिंदीतील बंडल लव-स्टोरीज पेक्षा उत्तरायण ही mature लव स्टोरी सर्वांना भावेल अशीच आहे. त्यामुळे हा चित्रपट पहाच आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला ते!
जाता जाता मला वेड लावणार्या उत्तरायणातील एका गाण्याच्या काही ओळी-
धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना..
वाऱ्यासंगे वाहता त्या पुलापाशी थांबना..
रमुनी साऱ्या या जगार रिक्त व्हावसे परी..
तैसे गुंफू गीत हे....

08 January 2007

राजनाथ म्हणतात मुंबईत मराठीत बोला ! Rajnath says speak Marathi in Mumbai !

या बातमी ने आम्हांस अत्यंत दिलासा मिळाला. बाळासाहेबांनी हिंदुत्व सोडून 'मराठीपणा'
वर जास्त लक्ष द्यावं,मुंबईत भगवा फडकवयाचा असेल तर...

मुलायमना खाली खेचा Mulayam should go

नोयडाचं भयंकर कांड घडले तरी माननीय मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव ह्यांनी स्थळास भेटही
देऊ नये? त्यांचा भाऊ येतो आणी 'फारसं गंभीर घडलं नाही!' अशी मुक्ताफळ उधळतो. माननीय
अमर सिंग (अमिताभदादा, जयावहिनी, अभिषेक भाच्या बरोबरच्या पार्टी संपल्यामुळे) टीवी
वर येतात काय आणि निठारी सोडून मूर्खासारखं कॉंग्रस व दिल्ली प्रशासनावर ताशेरे ओढतात.
अर्थात त्या माणसाकडून अजून काहीच अपेक्षा नाही. हे राजकारणी लोक इतके निर्लज्ज आणि
नालायक आहेत की काही बोलता सोय नाही.ह्यांच्या मुलांना पळवून, त्यांच्यावर दुष्क्रुत्य
करुन, त्याना खाऊन मग त्यांची हाडं गटारांत टाकली असती तेव्हा ह्यांना समजलं असतं... वेळ
आली आहे Justice for Nithari करीता.

ULFA kills Biharis! उल्फाचा उत्पात!

उल्फ़ाचा उत्पात!
उल्फांनी बिगर आसामी लोकांवर केलेल्या हल्ल्यांमुळे भयभीत झालेल्या हिंदी भाषिकांनी आसाममधून बाहेर पडण्यास सुरूवात केली. पंधरा-वीस जणांच्या समूह बिहारकडे परतण्यासाठी गुवाहाटी स्थानकावर उभा असल्याचे वृत्त आहे. राज्य प्रशासनाने हे वृत्त नाकारले आहे. दिब्रुगड, तीनसुकीया, सिबसागर या ठिकाणी उल्फांनी घडवून आणलेल्या हिंसाचारात ६४ जण ठार झाले तर चाळीस जण जखमी झाले.

हे सगळं केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाले आहे. केंद्र सरकारने भारतातील सर्व राज्यांना समान वागणूक कधीच दिली नाही. बिहार, उत्तर भारत,इशान्येकडील राज्ये मागास राहिली. मुंबई/महाराष्ट्र प्रगत झाली परंतु केंद्राने कधीही येथील भुमिपुत्रांना किंमत दिली नाही. उत्तर भारतीय लोकांच्या big brother attitude मुळे महाराष्ट्रात जिथे पहावे तिथे ही हिंदी लोक येतात आणि धुमाकूळ घालतात.
असो, आसामच्या लोकांना अथवा एकूणच इशान्येकडील लोकांवर जोरजबरद्स्ती करुन काहीही साध्य होणार नाही. त्यांची असंतुष्टता संपवण्यासाठी केंद्राने त्यांच्या भावनांची कदर करायला हवी. भारतीय सैन्याने कलकत्तयात काय गुण उधळले हे आपण पाहिलेच, मग ही लोक मणिपूर मध्ये काय धुमाकूळ घालतील ह्याची कल्पनाच न केलेली बरी. केंद्राच्या टाळक्यात ही गोष्ट येत नाही की मणिपूरी लोक ह्यांची सैन्याला कमी अधिकार द्यावा ही मागणी योग्य तर आहेच पण त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी हे पाऊल उचलले गेले पाहिजे.