13 January 2007
'बिनधास्त' आत हिंदीत- Friendship
मला तर हिंदी वा हिंदी चित्रपटाचे अजिबात कौतुक नाहीये. हिंदी चित्रपट फुकट केबलवर पहावयास मिळाले तर बघावे आणि आपले पैसे फक्त मराठी चित्रपटांवर खर्च करावा. तशीही हिंदी चित्रपटांची थिएटर/मल्टिप्लेक्स मध्ये पैसे खर्चून बघण्याची लायकी नसते.
असो, चाटेंना आवाहन. हिंदीत चित्रपट बनवलात चांगली गोष्ट आहे. त्याचं मराठी वृतपत्रात कौतुक करवून घेऊ नका. हिंदी भाषा वा हिंदी चित्रपट म्हणजे काय महान,स्वर्गीय व तत्सम नाही. तुमच्या चित्रपटाला भरघोस यश व पैसा मिळो. व तो तुम्ही जेव्हा मराठी चित्रपटांत लावाल तेव्हा आम्ही नकीच मल्टिप्लेक्स मध्ये बघायला येऊ.
11 January 2007
सा रे ग म प Sa re ga ma pa
परवा झी मराठी वरचे सारेगमप पाहिले. आमच्या घरी ई.टी.वी चे जास्त प्रस्थ असल्यामुळे मला झी मराठीवरच्या कार्यक्रमांची जास्त माहिती नव्हती. ३१ डिसेंबरच्या एका कार्यक्रमात सारेगमपची मंडळी औरंगाबादेत गात होती. (अगं बाई अरेच्चा मधील 'मल्हार वारी' या झकास गाण्याची वाट लावत होती!) पण नंतरची दादा कोंडक्यांची गाणी ठीक म्हटली. तेव्हापासून मला सारेगमप माहित झाले आणि मराठीत reality show चालू असल्याचे समाधान वाटले.
परवा प्रथमच पूर्ण भाग पाहिला. नव्या गाण्यांचा विशेष भाग होता. महेश मांजरेकर (भयानक चेहरा आणि तोडकं मराठी बोलत होता. हिंदीत गेल्यावर यांचे चालढंग, कपडे आणि केसं सगळंच बदलत!) विशेष अतिथी होता. बहुतेक स्पर्धकांनी चांगली गाणी म्हटली. BTW माझी फ़ेवरेट मुंबईची आनंदी जोशी आहे. तिचा चेहरा आणि आवाज खूप आवडला! आनंदी ने अवधूत गुप्ते याचे गाणे म्हटले. मी कधी ऐकले नव्हते पण हा माणूस चांगला संगीतकार आहे. इतर काही स्पर्धकांनी सुध्दा त्याची गाणी म्हटली. कोल्हापूरच्या अभिजीत कोसंबीने 'वाऱ्यावरती रंग पसरले..' ह्या सुंदर गाण्याची वाट लावली.
पण सगळ्यात कमाल केली ते अनघा आणी मंगेश बोरगावकरानी. अनघाने कोणतं गांण म्हटल ते आठवत नाही पण मंगेशनी श्रीरंग गोडबोले लिखीत आणि अजय-अतुलचे संगीत असलेले 'महाराष्ट्र-गीत' म्हटले. ते त्यानी इतके जोशात गायले की अवधुतने म्हटल्याप्रमाणे अंगावर काटा उभा राहिला. सिंगर ऑफ द डे चा मान अर्थातच त्याला मिळाला. मी आता सारेगमपचे पुन:प्रक्षेपण कधी होतंय त्यावर नजर ठेवुन आहे. मला त्याचे गाणे रेकॉर्ड करायचं आहे. असो तुम्ही वोट देत आहात ना? या वेळेसचे माझे मत आनंदीला दिलं (आयडीया कंपनी चोर आहे,तीन रुपये पडतात एका smsला!) म्हणून मंगेशला वोट bsnl वरुन देणार आहे!
09 January 2007
उत्तरायण Uttarayan
उत्तरायण चित्रपट जयवंत दळवींच्या ''दुर्गी'' या कथेवर आधारीत आहे. चित्रपटांच्या सुरुवातीचे १९६०च्या पुण्याचे वातावरण बघून मला आजकालच्या ग्लोबलाईझेशनच्या धावपळीचा कंटाळा आला. चित्रपटांच्या सुरुवातीचे सुमधुर संगीत मनाला वेड लावते. उत्तरायणच्या संहितेबरोबरच संगीत हे या चित्रपटाचा plus point आहे. कुठल्याशा मराठी चॅनलवर उत्तरायणचे मेकिंग दाखवित असताना ह्या gifted संगीतकाराची ओळख झाली. (ह्या मेकिंगच्या वेळीस दिग्दर्शकांनी एकही मराठी शब्द उच्चारला नाही). सगळीच्या सगळी गाणी श्रवणीय आहेत. गाणी कुलटोड या साईटवर उपलब्ध आहेत.
नीना कुलकर्णी आणि शिवाजी साटम ह्यांनी उत्तम काम केलंय. पण मला विशेष आवडलेले चेहरे म्हणजे तरुण नीना कुलकर्णीची भुमिका करणारी अभिनेत्री (जी आता बेटियाँ अपनी या पराया धन नामक रटाळ मालिकेत काम करते) आणी शिवाजी साटम ह्यांच्या सुनेची भुमिका करणारी (उन-पाउस मधील प्रिया). त्याच बरोबर blink and miss अश्या एकाच सीन मध्ये असलेली प्रियाची मैत्रीण सुध्दा सुरेख दिसते!
हिंदीतील बंडल लव-स्टोरीज पेक्षा उत्तरायण ही mature लव स्टोरी सर्वांना भावेल अशीच आहे. त्यामुळे हा चित्रपट पहाच आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला ते!
जाता जाता मला वेड लावणार्या उत्तरायणातील एका गाण्याच्या काही ओळी-
धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना..
वाऱ्यासंगे वाहता त्या पुलापाशी थांबना..
रमुनी साऱ्या या जगार रिक्त व्हावसे परी..
तैसे गुंफू गीत हे....
08 January 2007
राजनाथ म्हणतात मुंबईत मराठीत बोला ! Rajnath says speak Marathi in Mumbai !
वर जास्त लक्ष द्यावं,मुंबईत भगवा फडकवयाचा असेल तर...
मुलायमना खाली खेचा Mulayam should go
देऊ नये? त्यांचा भाऊ येतो आणी 'फारसं गंभीर घडलं नाही!' अशी मुक्ताफळ उधळतो. माननीय
अमर सिंग (अमिताभदादा, जयावहिनी, अभिषेक भाच्या बरोबरच्या पार्टी संपल्यामुळे) टीवी
वर येतात काय आणि निठारी सोडून मूर्खासारखं कॉंग्रस व दिल्ली प्रशासनावर ताशेरे ओढतात.
अर्थात त्या माणसाकडून अजून काहीच अपेक्षा नाही. हे राजकारणी लोक इतके निर्लज्ज आणि
नालायक आहेत की काही बोलता सोय नाही.ह्यांच्या मुलांना पळवून, त्यांच्यावर दुष्क्रुत्य
करुन, त्याना खाऊन मग त्यांची हाडं गटारांत टाकली असती तेव्हा ह्यांना समजलं असतं... वेळ
आली आहे Justice for Nithari करीता.
ULFA kills Biharis! उल्फाचा उत्पात!
उल्फांनी बिगर आसामी लोकांवर केलेल्या हल्ल्यांमुळे भयभीत झालेल्या हिंदी भाषिकांनी आसाममधून बाहेर पडण्यास सुरूवात केली. पंधरा-वीस जणांच्या समूह बिहारकडे परतण्यासाठी गुवाहाटी स्थानकावर उभा असल्याचे वृत्त आहे. राज्य प्रशासनाने हे वृत्त नाकारले आहे. दिब्रुगड, तीनसुकीया, सिबसागर या ठिकाणी उल्फांनी घडवून आणलेल्या हिंसाचारात ६४ जण ठार झाले तर चाळीस जण जखमी झाले.
हे सगळं केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाले आहे. केंद्र सरकारने भारतातील सर्व राज्यांना समान वागणूक कधीच दिली नाही. बिहार, उत्तर भारत,इशान्येकडील राज्ये मागास राहिली. मुंबई/महाराष्ट्र प्रगत झाली परंतु केंद्राने कधीही येथील भुमिपुत्रांना किंमत दिली नाही. उत्तर भारतीय लोकांच्या big brother attitude मुळे महाराष्ट्रात जिथे पहावे तिथे ही हिंदी लोक येतात आणि धुमाकूळ घालतात.
असो, आसामच्या लोकांना अथवा एकूणच इशान्येकडील लोकांवर जोरजबरद्स्ती करुन काहीही साध्य होणार नाही. त्यांची असंतुष्टता संपवण्यासाठी केंद्राने त्यांच्या भावनांची कदर करायला हवी. भारतीय सैन्याने कलकत्तयात काय गुण उधळले हे आपण पाहिलेच, मग ही लोक मणिपूर मध्ये काय धुमाकूळ घालतील ह्याची कल्पनाच न केलेली बरी. केंद्राच्या टाळक्यात ही गोष्ट येत नाही की मणिपूरी लोक ह्यांची सैन्याला कमी अधिकार द्यावा ही मागणी योग्य तर आहेच पण त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी हे पाऊल उचलले गेले पाहिजे.
Marathi music मराठी संगीताला चांगले दिवस
नव्या मराठी चित्रपटांतील गाणी आता मराठी रसिकांच्याच ओठावर रेंगाळत नाहीत. त्यामुळे
त्यांचे संगीताचे हक्कही विकले जात नाहीत. मराठी चित्रपटसंगीताच्या दुर्दैवाचे असे दशावतार
सुरू असताना आगामी 'घरकुल' या सत्यजीत कुलकणीर् दिग्दशिर्त चित्रपटासाठी तब्बल १२
गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत अन् विशेष म्हणजे, हिंदीतल्या आघाडीच्या गायक-गायिकांनी
ती गायली आहेत. सुनिधी चौहान, कुमार सानू, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन, आलिशा
चिनॉय, सुखविंदर, साधना सरगम, कुणाल गांजावाला, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, वैशाली
सामंत असा ख्यातकीर्त गायकांचा फौजफाटा एका मराठी सिनेमात एकत्र येण्याचा हा पहिलाच
योग आहे.
' घरकुल'साठी प्रवीण दवणे यांची गाणी अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केली आहेत. सुदेश
भोसले यांचा मुलगा सिद्धांत भोसले आणि अमृता खाडिलकर-नातू यांनीही या सिनेमाची गाणी
गायली आहेत. या सिनेमाची गाणी रेकॉर्ड करण्यासाठी सुमारे २०-२२ लाख रुपये खचिर्ले गेले
आहेत. एवढ्या बजेटमध्ये अख्खा मराठी चित्रपट बनवतात काही निर्माते-दिग्दर्शक. 'घरकुल'चं
वैशिष्ट्य इथेच संपत नाही. हा मराठीतला खऱ्या अर्थानं मल्टिस्टारर सिनेमा आहे. यात तब्बल
२८ प्रमुख कलावंत काम करताहेत. दुय्यम भूमिकांमध्येही २२ ते २५ कलावंत असतील या फिल्मचे
चित्रीकरण फेब्रुवारी महिन्यात होणार असून रीतसर कास्टिंग सुरू झाले आहे.
निर्माता-दिग्दर्शक सत्यजीत कुलकणीर् म्हणाले की, 'घरकुल' हे माझं स्वप्न आहे आणि त्यामुळे
आथिर्क गणितांचा विचार फारसा केलेला नाही. कुठेही तडजोड करून दुसऱ्या ठिकाणी वायफळ
खर्च करण्याचा अति'शहाणपणा' केलेला नाही. त्यामुळे इतक्या गुणीजनांनी माझ्या फिल्ममध्ये
गाणी गाऊन खरंच तिला चार चाँद लावले आहेत.
' घरकुल'मधील गाण्यांच्या आल्बमचा नजराणा जानेवारी महिन्यात रसिकांसाठी खुला होईल.
सध्या दहा गाणी रेकॉर्ड झाली आहेत. उर्वरित दोन गाणी येत्या २१ ते २३ डिसेंबर या
कालावधीत रेकॉर्र्ड होणार आहेत.
नॉन फिल्मी संगीतच लोकप्रिय
गेल्या काही वर्षांपासून मराठीमध्ये तुफान लोकप्रिय झाली ती गाणी बहुतांशी नॉन फिल्मी
होती. त्यामध्ये कोळीगीतं, लोकगीतं, रिमिक्स, लावण्यांचा भर होता. मराठी फिल्मी
गीतांना वाद्यवृंदांच्या गीतांनी पुनरुज्जीवित केले. भक्तिसंगीतानेही लाखो रुपयांची उलाढाल
केली. त्यासोबत नॉन फिल्मी गाण्यांमध्ये सुपरहिट अल्बम ठरण्याचा मान प्रामुख्याने 'मी
बाबूराव बोलतोय', 'रेतीवाला नवरा पाहिजे,' 'रसिकाच्या लग्नाला या' या गाण्यांनी
मिळवला. 'अगं बाई अरेच्चा', 'नवरा माझा नवसाचा' अशा काही निवडक सिनेमांमधील
गाण्यांनी अलीकडच्या काळात लोकप्रियतेचा ठसा उमटवला.
05 January 2007
मराठी चित्र संगीत Marathi film music
राष्ट्रपती पदक मिळवलेल्या पहिल्या चित्रपटानंतर कुठल्याही मराठी चित्राला हे पदक
मिळाले नाही. पन्नास वर्षाच्या gap नंतर संदीप सावंत यांनी राष्ट्रपती पदक तर मिळवलेच
पण ऑस्करला जाण्याचा मान देखिल पटकावला. भारताच्या वतीने नेहमीच so-called
राष्ट्रभाषा हिंदी चे अत्यंत चुकार चित्रपट पाठवले जातात. सुदैवाने मराठी माणूस ऑस्करच्या
स्पर्धेत नेहमीच लकी ठरला आहे. मग ते संदीप सावंत असो वा आशुतोष गोवारीकर, अमोल
पालेकर असो अथवा भानु अथैया. असो सांगण्याचा मुद्दा हा की ऑस्करला पाठविला गेलेला
पहिला so-called प्रादेशिक चित्रपट म्हणजे 'श्वास'.
गोल गोल फिरुन मुळ मुद्द्यावर येतो. श्वास ने मराठी चित्रपटसृष्टीत श्वास ओतला आणि नवीन
विषयांचे दर्जेदार चित्रपट निर्माण होऊ लागले. मराठी प्रेक्षक सुध्दा गर्दी करु लागले.
केदार शिंदे गजेंद्र अहिरे स्मिता तळवलकर संजय सूरकर भरत जाधव महेश कोठारे ही मंडळी नव्या
दमाच्या मराठी चित्रपटसृष्टीत चमकू लागले आहेत. पण माझा मुद्दा पुन्हा तो नाही आहे. मला
सांगायचे होते नव्या मराठी चित्रसंगीताबद्दल. मराठी चित्राने कात टाकली तशीच मराठी
चित्रसंगीतानेही. मला या लाटेतील आवडलेले चित्रपट संगीत- 'भेट' (दि-चंद्रकांत कुलकर्णी),
अगं बाई अरेच्चा, उत्तरायण, जत्रा, यंदा कर्तव्य आहे, सरीवर सरी, सातच्या आत घरात. या
बद्दल विस्ताराने लिहिन पण आत खरच मुळ मुद्द्यावर येतो. आपल्याला मराठी संगीत उतरुन
(डाऊनलोड) करायचे असल्यास खालील साईट पहा- आपल्याकडे काही मराठी गाणी असल्यास
आपण देखिल या साईट मार्फत इतरांशी शेयर करु शकता.
http://music.cooltoad.com/music/category.php?id=10330
For new Marathi film music plz see above website. If u cant read Marathi
u need to enable Marathi on ur computer. To write in Marathi see
Maharashtra
Maharashtra pronunciation (help·info) (Marathi: महाराष्ट्र mahārāṣṭra, English: Great Nation, IPA: [məhaːraːʂʈrə]) is India's third largest state in terms of area and second largest in terms of population after Uttar Pradesh. It is bordered by the states of Gujarat, Madhya Pradesh, Chhattisgarh, Andhra Pradesh, Karnataka, Goa and the Union territory of Dadra and Nagar Haveli. The Arabian Sea makes up the state's western coast. Mumbai, India's largest city, is the capital of Maharashtra.
Maharashtra was known as Rashtra in the Rig Veda, Rashtrik in Ashoka's inscriptions, and Maha rashtra afterwards, as attested by Huein-Tsang and other travellers. The name appears to have been derived from Maharashtri, in an old form of Prakrit, an ancient Indian language.
However, there are other theories put forward by different schools of thought. One possible derivation is believed to be the corruption of the term Maha Kantara, which means "Great Forest"[1]. Both these theories did not carry much weight, as can be seen from the name of Maharashtra.
History
Medieval history and Islamic rule
Not much is known about Maharashtra's early history, and its recorded history dates back to the 3rd century BC, with the use the Maharastri language, a Prakrit corruption of Sanskrit. Maharashtra was known as Dandakaranya, i.e. the jungle (aranya) which bound by rules (dandakas). Later, Maharashtra became a part of the Magadha empire, ruled by the Buddhist emperor Ashoka. The port town of Sopara, just north of present day Mumbai, was the centre of ancient India's commerce, with links to Eastern Africa, Mesopotamia, Aden and Cochin. With the disintegration of the Mauryan Empire, a local dynasty called Satavahanas came into prominence in Maharashtra between 230 BC and AD 225. The peroid saw the biggest cultural development of Maharashtra. The Satavahana's official language was Maharashtri, which later developed into Marathi. The great ruler Gautamiputra Satkarni (also known as "Shalivahan") ruled around 78 AD. He started the Shalivahana era, a new calendar, still used by Maharashtrian populace. The empire gradually disintegrated in the third century.
During the reign of the Vakatakas (AD 250–525), Vidarbha, the eastern region of Maharashtra, come under their rule. During this period, development of arts, religion and technology flourished. By the 6th century, Maharashtra came under the reign of the Chalukyas from Badami. Later, in 753, the region was governed by Rashtrakutas, an empire that spread over most of peninsula India. In 973, the Chalukayas of Badami expelled the Rashtrakutas, and ruled parts of Maharashtra until 1189 when the region came under the hands of the Yadavas of Deogiri.
Maharashtra came under Islamic influence for the first time after the Delhi Sultanate rulers Ala-ud-din Khalji, and later Muhammad bin Tughluq appropriated parts of the Deccan in the 13th century. After the collapse of the Tughlaqs in 1347, the Bahmani Sultanate of Bijapur took over, governing the region for the next 150 years. By the 16th century, central Maharashtra was ruled by numerous autonomous Islamic kingdoms that owed allegiance to the Mughals, while coastal region was annexed by the Portuguese, in their quest to seize control of the spice trade.
Marathas and Peshwas
By the early seventeenth century the Maratha Empire began to take root. The Marathas, native to western Maharashtra, were led by Chhatrapati Raje Shivaji Bhosale, who was crowned king in 1674. Shivaji Maharaj (as he was refered to by his subjects) fought many battles with Mughal empire which was then ruled by Aurangzeb. He also fought several battles with King of Vijapur, Adilshah. Later he was engaged in few small battles with British army who were then in the early stages of their long and exhaustive control over Maharsahtra. Shivaji Raje was the most able, succesful, popular and respected king Maharashtra ever had.
Shivaji's son and successor, Sambhaji Bhosale was captured and executed by Aurangzeb, the Mughal in the late 1680s. The Mughals forced Sambhaji's younger brother, Rajaram Bhosale to flee into the Tamil-speaking countryside. He retreated to the Jinji Fort|great fortress of Jinji (sometimes anglicised to Ginjee) to barely recover in the early 18th century, in somewhat changed circumstances.
Rajaram's nephew & Sambhaji's son, Shahu Bhosale considered himself to be the legitimate heir to the Bhosale throne. In 1714, Shahu's Peshwa (chief minister) Balaji Vishwanath, helped him seize the Maratha throne in 1708, with some acrimony from Rajaram's widow, Tara Bai.
In the following four decades, the Peshwas virtually took over central authority in the Maratha state, reducing Shivaji's Bhosale dynasty to figureheads. After defeating the Mughals, the Peshwas became the dominant rulers of India. Peshwas not only ruled Maharashtra, but their empire was also covering Delhi (Panipat)- Gujarat ( Mehsana) - Madhya Pradesh (Gwalior, Indore) and to south till Thanjaur.
The Peshwas, Balaji Vishwanath and his son, Baji Rao I, bureaucratized the Maratha state. They systematized the practice of tribute gathering from Mughal territories, under the heads of sardesmukhi and chauth (the two terms corresponding to the proportion of revenue collected). They also consolidated Mughal-derived methods of assessment and collection of land revenue and other taxes. Much of the revenue terminology used in Peshwa documents derives from Persian, suggesting a far greater continuity between Mughal and Maratha revenue practice than may be politically palatable in the present day.
The years under Peshwa rule, saw the development of sophisticated networks of trade, banking, and finance; the rise of substantial banking houses based at Pune, with branches extending into Gujarat, the Ganges Valley, and the south; and an expansion of the agricultural frontier.
At the same time, Balaji Vishwanath cultivated the maritime Angre clan, which controlled a fleet of vessels based in Kolaba and other centres of the west coast. These ships posed a threat not only to the new English settlement of Bombay, but to the Portuguese at Goa, Bassein, and Daman.
On the other hand, there also emerged a far larger domain of activity away from the original heartland of the Marathas, which was given over to subordinate chiefs as fiefs. Gwalior was given to Scindia, Indore to Holkar, Baroda to Gaekwad and Dhar to Pawar.
After suffering a heavy defeat to the Afghan chieftain Ahmad Shah Abdali, in the Third Battle of Panipat in 1761, the Maratha Confederacy broke into regional kingdoms.
Post-Panipat, the Peshwa's ex-generals looked after the little kingdoms they had been given. Pune continued to be ruled by what was left of the Peshwa family.
Branches of the Bhosale family itself, relocated to Kolhapur, while the main line remained in the Deccan heartland, at Satara. The Kolhapur Bhosales derived from Rajaram and his wife, Maharani Tara Bai, who had refused in 1708 to accept Shahu's rule. The Kolhapur Bhosales remained in control of minuscule territory into the early 19th century.
British Rule and Post-Independence
With the arrival and subsequent involvement of the British East India Company in Indian politics, the Marathas and the British fought the three Anglo-Maratha wars between 1777 and 1818, culminating in the annexation of Peshwa-ruled territory in Maharashtra in 1819, which heralded the end of the Maratha empire.
The British governed the region as part of the Bombay Presidency, which spanned an area from Karachi in Pakistan to most of the northern Deccan. A number of the Maratha states persisted as princely states, retaining local autonomy in return for acknowledging British sovereignty. The largest princely states in the territory of present-day Maharashtra were Nagpur, Satara and Kolhapur; Satara was annexed to Bombay Presidency in 1848, and Nagpur was annexed in 1853 to become Nagpur Province, later part of the Central Provinces. Berar, which had been part of the Nizam of Hyderabad's kingdom, was occupied by the British in 1853 and annexed to the Central Provinces in 1903. A large part of present day Maharashtra called Marathwada remained part of the Nizam's Hyderabad state during British rule.The British rule was marked by social reforms, an improvement in infrastructure as well revolts due to their discriminatory policies. At the beginning of the 20th century, A non-violent struggle started by Bal Gangadhar Tilak and later led by Mahatma Gandhi began to take shape. In 1942, the Quit India Movement was called by Mahatma Gandhi which was marked by a non-violent civil disobedience movement and strikes.Mumbai is the capital
After India's independence in 1947, the princely states were integrated into the Indian Union, and the Deccan States including Kolhapur were integrated into Bombay State, which was created from the former Bombay Presidency in 1950. In 1956, the States Reorganisation Act reorganized the Indian states along linguistic lines, and Bombay Presidency State was enlarged by the addition the predominantly Marathi-speaking regions of Marathwada (Aurangabad Division) from erstwhile Hyderabad state and Vidarbha region (Amravati and Nagpur divisions) from Madhya Pradesh (formerly the Central Provinces and Berar). On May 1, 1960, Maharashtra came into existence when Bombay Presidency State was split into the new linguistic states of Maharashtra and Gujarat.
Geography
Maharashtra encompasses an area of 308,000 km² (119,000 mi²),and is the third largest state in India after Rajasthan and Madhya Pradesh. Maharashtra is bordered by the states of Madhya Pradesh to the north, Chhattisgarh to the east, Andhra Pradesh to the southeast, Karnataka to the south, and Goa to the southwest. The state of Gujarat lies to the northwest, with the Union territory of Dadra and Nagar Haveli sandwiched in between. The Arabian Sea makes up Maharashtra's west coast.
The Western Ghats are a hilly range running parallel to the coast, at an average elevation of 1,200 metres (4,000 feet)). To the west of these hills lie the Konkan coastal plains, which is 50 – 80 kilometres in width. To the east of the Ghats lies the flat Deccan Plateau. The Western Ghats form one of the three watersheds of India, from which many South Indian rivers originate. To the north of the state, near the Madhya Pradesh border, lies the Satpura Range. The various sections of the Western Ghats of Maharashtra are Tamhini Ghat, Varandha Ghat and Sawantwadi Ghat.
The Western Ghats form the source of several major rivers of Maharashtra, notable among them being Godavari River and the Krishna River. The rivers, along with their tributaries, flow eastwards into the Bay of Bengal, irrigating most of central and eastern Maharashtra. The Ghats are also the source of numerous small rivers which flow westwards emptying into the Arabian Sea. To the north of the state, the Tapti River and River Narmada flow westwards into the Arabian Sea, irrigating most of northern Maharashtra. To the east are major rivers like Vainganga that flow to the south and eventually to Bay of Bengal.
There are many multi-state irrigation projects in development, including Godavari River Basin Irrigation Projects.
The plateau is composed of black basalt soil, rich in humus. This soil is well suited for cultivating cotton, and hence is often called black cotton soil.
Protected areas of Maharashtra
Several wildlife sanctuaries, national parks and Project Tiger reserves have been created in Maharashtra, with the aim of conserving the rich bio-diversity of the region. As of May 2004, India has 92 national parks, of which 5 are located in Maharashtra. Much of Maharashtra's forests and consequently the wildlife are in Vidarbha region. These are:
- Gugamal National Park, also known as Melghat Tiger Reserve is located in Vidarbha region in Amravati district.
- Navegaon National Park, located near Nagpur in the eastern region of Vidarbha is home to many species of birds, deer, bears and leopards.
- Pench National Park, in Nagpur district also in Vidarbha, extends into Madhya Pradesh as well. It has now been upgraded into a Tiger project.
- Sanjay Gandhi National Park, also known as Borivali National Park is located in Mumbai and is the world's largest national park within city limits.
- Tadoba Andhari Tiger Project, is a prominent tiger reserve near Chandrapur in Vidarbha.
Apart from these, Maharashtra has 35 wild life sanctuaries spread all over the state, listed here. The Nagzira (Bhandara district), Phansad Wildlife Sanctuary, and the Koyna Wildlife Sanctuary are the important ones.
Economy
Macro-economic trend
This is a chart of trend of gross state domestic product of Maharashtra at market prices estimated by Ministry of Statistics and Programme Implementation with figures in millions of Indian Rupees.
Year | Gross State Domestic Product |
---|---|
1980 | 166,310 |
1985 | 296,160 |
1990 | 644,330 |
1995 | 1,578,180 |
2000 | 2,386,720 |
Favourable economic policies in the 1970s led to Maharashtra becoming India's leading industrial state. However, regions within Maharashtra show wide disparity in development. Apart from Mumbai, western Maharashtra is the most advanced. It also dominates the politics and bureaucracy of the state. This has led to resentment among backward regions like Vidarbha, Marathwada, and Konkan. There is a movement in Vidarbha now to separate from Maharashtra and become a separate state largely owing to lack of development and perceived sense of injustice.
Maharashtra's gross state domestic product for 2004 is estimated at $106 billion in current prices. Maharastra is second most urbanised state.
Maharashtra's is India's leading industrial state contributing 13% of national industrial output. 64.14% of the people are employed in agriculture and allied activities. Almost 46% of the GSDP is contributed by industry. Major industries in Maharashtra include chemical and allied products, electrical and non-electrical machinery, textiles, petroleum and allied products. Other important industries include metal products, wine, jewellery, pharmaceuticals, engineering goods, machine tools, steel and iron castings and plastic wares. Food crops include mangoes, grapes, bananas, oranges, wheat, rice, jowar, bajra, and pulses. Cash crops include groundnut, cotton, sugarcane, turmeric, and tobacco. The net irrigated area totals 33,500 square kilometres.
Mumbai, the capital of Maharashtra houses the headquarters of almost all major banks, financial institutions, insurance companies and mutual funds. Within Mumbai is located Bollywood, the centre of India's Hindi film and television industry. India's largest stock exchange Bombay Stock Exchange, oldest in Asia, is located in the city. After successes in the information technology in the neighbouring states, Maharashtra has set up software parks in Pune, Nagpur, Mumbai, and Nasik.
Maharashtra ranks first nationwide in coal-based thermal electricity as well as nuclear electricity generation with national market shares of over 13% and 17% respectively.
Maharashtra is also becoming in Jatropha cultivation and has started a project for the identification of suitable sites for Jatropha plantations.[2]
Ralegaon Siddhi is a village in Ahmednagar District that is considered a model of environmental conservation.[3]
Over 41% of the S&P CNX 500 conglomerates have corporate offices in Maharashtra.
- See also: List of conglomerates in Maharashtra
Government
Like all states in India, the head of state is the governor, appointed by the Central government. His or her post is largely ceremonial. The Chief Minister is the head of government and is vested with most of the executive powers. Maharashtra's capital is Mumbai, home to the Vidhan Sabha – the state assembly and Mantralaya, the administrative offices of the government. It is also home to the Bombay High Court which has jurisdiction over Maharashtra, Goa, and the Union Territory of Daman and Diu. The legislature convenes its budget and monsoon sessions in Mumbai, and the winter session in Nagpur, which was designated as the state's auxiliary capital.
Maharashtra's legislature is bicameral, one of the few states in India to have a bicameral type. The Vidhan Sabha (Legislative Assembly) is the lower house consisting of directly elected members. The Vidhan Parishad (Legislative Council) is the upper house, whose members are indirectly voted through an electoral college. Maharashtra is allocated nineteen seats in the Rajya Sabha and forty-eight in the Lok Sabha, India's national parliament.
After India's independence, most of Maharashtra's political history was dominated by the Congress party. Maharashtra became a bastion of the Congress party producing stalwarts such as Y.B. Chavan, one of its most prominent Chief Ministers. The party enjoyed near unchallenged dominance of the political landscape until 1995 when the right wing Shiv Sena and BJP secured an overwhelming majority in the state to form a coalition. After a split in the Congress party, former chief minister Sharad Pawar formed the Nationalist Congress Party (NCP), but formed a coalition with the Congress to keep out the BJP-SS combine. The 2004 elections saw the NCP gaining the largest number of seats to become the state's largest party, eroding much of the Shiv Sena's base. Under a pre-poll power sharing agreement, the Chief Minister would be from the Congress while the deputy Chief Minister would be from the NCP. Vilasrao Deshmukh is current CM and R. R. Patil (NCP) is DCM.
Revenues of Government
This is a chart of trend of own tax revenues (excluding the shares from Union tax pool) of the Government of Maharashtra assessed by the Finance Commissions from time to time with figures in millions of Indian Rupees.[4]
Year | Own Tax Revenues |
---|---|
2000 | 198,821 |
2005 | 332,476 |
This is a chart of trend of own non-tax revenues (excluding the shares from Union tax pool) of the Government of Maharashtra assessed by the Finance Commissions from time to time with figures in millions of Indian Rupees.[5]
Year | Own Non-tax Revenues |
---|---|
2000 | 26,030 |
2005 | 30,536 |
Demographics
A person native to the state is called a Maharashtrian. As per the 2001 census, Maharashtra has a population of 96,752,247 inhabitants making it the second most populous state in India, and the second most populous country subdivision in existence. The Marathi-speaking population of Maharashtra numbers 62,481,681 according to the 2001 census. This is a reflection of the cosmopolitan nature of the state. Only eleven countries of the world have a population greater than Maharashtra. Its density is 322.5 inhabitants per square kilometre. Males constitute 50.3 million and females, 46.4 million. Maharashtra's urban population stands at 42.4%. Its sex ratio is 922 females to 1000 males. 77.27% of its population is literate, broken into 86.2% males and 67.5% females. Its growth rate between 1991-2001 was pegged at 22.57%.
Marathi is the official state language. Marathi is spoken by a vast majority of its populace. In Mumbai however, due to its cosmopolitan nature, Hindi, Gujarati and English, along with a variety of other languages are widely spoken along with Marathi. Marathi, English and sometimes Hindi are used for official purposes. In the northwest portion of Maharashtra, a dialect Ahirani is spoken by a minority. In south Konkan, a dialect of Konkani (sometimes called a dialect of Marathi) called as Malvani is speaken by most of the people. In the Desh region of the Deccan, a dialect called Deshi is spoken. While in Vidarbha, a dialect of Marathi, known as Varhadi is spoken by most of the people.
The state has a Hindu majority of 80.2% with minorities of Muslims 10.6%, Buddhists 6%, Jains 1.3% and Christians 1%. Maharashtra has the biggest Jain, Zoroastrian and Jewish populations in India.
Divisions
- Main article: Districts of Maharashtra
Maharashtra is divided into thirty-five districts, which are grouped into six divisions: Aurangabad Division, Amravati Division, Konkan Division, Nagpur Division, Nashik Division, and Pune Division. These are official revenue divisions of government of Maharashtra.
Geographically, historically and according to political sentiments Maharashtra has five main regions: Vidarbha or Berar (Nagpur and Amravati divisions), Marathwada (Aurangabad Division), Khandesh and Northern Maharashtra (Nashik Division), Desh or Western Maharashtra (Pune Division), and Konkan (Konkan Division).
Transport
The Indian Railways covers most of the Maharashtra and is the preferred mode of transport over long distances. Almost the entire state comes under the Central Railways branch which is headquartered in Mumbai. Most of the coast south of Mumbai comes under the Konkan Railway. Maharashtra State Road Transport Corporation buses, popularly called ST or MSRTC, link most of the towns and villages and have a large network of operation. These buses, run by the state government are the preferred mode of transport for much of its populace. In addition to the government run buses, private run luxury buses are also a popular mode of transport between major towns.
Mumbai has the biggest international airport in Maharashtra. Nagpur is the second city having an international airport. It has regular flights to Sharjah and Bangkok besides large number of domestic connections. Pune has a limited capacity international airport with flights to Dubai and Singapore. Other large towns such as Aurangabad, Ratnagiri, Kolhapur and Nashik are served by domestic airlines. Ferry services also operate near the capital, linking the city to neighbouring coastal towns. Other modes of public transport, such as a seven-seater tempo have gained popularity in semi-urban areas. Maharashtra has a large highway network and recently built the Mumbai-Pune Expressway, the first controlled-access toll road project in India. Another major highway linking Mumbai with second capital Nagpur is in the works. Maharashtra has three major ports at Mumbai (operated by the Mumbai Port Trust), the JNPT lying across the Mumbai harbour in Nhava Sheva, and in Ratnagiri, which handles the export of ores mined in the Maharastra hinterland.
Culture
Hindus form the majority of Maharashtra population & the culture of Maharashtra reflects that. There are many temples in Maharashtra some of them being hundreds of years old. These temples are constructed in a fusion of architectural styles from borrowed from North and South India. The temples also blend themes from Hindu, Buddhist and Jain cultures. The temple of Vitthala at Pandharpur may be considered the most important to the Maharashtrian Hindu population. Many of the temples are tourist attractions with the most famous amongst them being the Ajanta and Ellora Caves near Aurangabad. A famous example of Mughal architecture is the tomb of the wife of Aurangzeb called Bibi Ka Maqbara also located at Aurangabad. The landscape of Maharashtra is dotted with many forts, like Raigad and Pratapgad which played an extremely important part in the establishment of the Maratha empire and also sea forts like the one at Sindhudurg.
The folk music of Maharashtra is of various types viz. Gondhal, Lavani, Bharud, Powada, etc.
One of the earliest instances of Marathi literature is by Dnyaneshwar with his Bhawarthadeepika (popularly known as Dnyaneshwari). The religious songs called bhajans by saints like Dnyaneshwar, Tukaram, Namdev are very poular. Modern Marathi literature has its share of great poets and authors. P. L. Deshpande, Kusumagraj, Prahlad Keshav Atre, Vyankatesh Madgulkar are a few of them. A large number of books are published every year in Marathi.
The theatre, movies and television in Maharashtra are chiefly based out of Mumbai with the actors moving freely between the different media. Some notable names in the movie industry include the pioneer of Indian movie industry, Dadasaheb Phalke,writer, director, actor P. L. Deshpande, actor Ashok Saraf, actor Laxmikant Berde, actor & producer, Sachin Pilgaonkar, Mahesh Kothare and actor, producer & director V. Shantaram. The early period of Marathi theatre was dominated by playwrights like Kolhatkar, Khadilkar, Deval, Gadkari and Kirloskar who enriched the Marathi theatre for about half a century with excellent musical plays known as Sangeet Naatak and the genre of music used in such plays known as Natyasangeet. It is during this era of the Marathi theatre that great singer actors like Bal Gandharva, Keshavrao Bhosle, Bhaurao Kolhatkar, Dinanath Mangeshkar thrived.
Some of the popular Marathi television channels are Zee Marathi and ETV Marathi, with shows ranging from soap operas, cooking and travel to political satire and game shows.
The cuisine of Maharashtra varies according to the region of Maharashtra. The people of the Konkan region have a chiefly rice based diet with fish being a major component for people living close to the sea. In eastern Maharashtra, the diet is based more on Wheat, Jowar and Bajra. All kinds of lentils, onions, tomatoes, potatoes, chilies, garlic and ginger are common ingredients in the cuisine of Maharashtra. Chicken and Mutton are also widely eaten throughout the state.
Women traditionally wor a nine yard sari and men a dhoti or pajama with a shirt. This, however, is changing with women ine urban Maharashtra wearing Punjabi dresses, consisting of a Salwar and a Kurta while men wear trousers and a shirt.
As in all of India, Cricket is widely followed and played. Kabaddi is also played. Children’s games include Viti-Dandu (Gilli-danda in Hindi) and Pakada-pakadi (Tag).
Hindus in Maharashtra follow the Saka era calendar. Gudi Padwa, Diwali, Rangapanchami, Gokulashtami and Ganeshotsav are some of the festivals that are celebrated in Maharashtra.Ganeshotsav is the biggest festival of Maharashtra which is celebrated with much reverence and festivity throughout the state and has since some time become popular all over the country. The festival which continues over ten days is in honour of Ganesha the God of learning and knowledge. A large number of people walk hundreds of kilometers to Pandharpur for the annual pilgrimage in the month of Ashadh.
04 January 2007
Maharashtra state information
नावाचा उगम
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जावू लागले असे ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महार व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महा-कंतारा (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.
इतिहास
महाराष्ट्रातील विविध स्थळांचा-नदी,पर्वत,स्थळ इ.- रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. व्यवस्थित माहितीची उपलब्ध ऐतिहासिक साधने इ.स.पूर्व तिसर्या शतकापासून महाराष्ट्राची माहिती देतात.महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरी चे यादव, अल्ला उद्दिन खिलजी, मुहम्मद बीन तुघलक, पोर्तुगीज, विजापुर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्रज, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.
मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य
महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापरामुळे ३रया शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते,परंतु सातवाहन, देवगीरीचे यादव व शालिवाहन यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी ख्रि.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरित झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स ७८ रोजी महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सत्कारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू शालिवाहन शक आजही रूढ आहे.
त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापीत केले.१३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अलाउद्दीन खिलकी व नंतर मोहम्म्द बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स.१३४७ तुघलकांच्या पडावानंतर बिजापूरच्या बाहमनी सुल्तानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.
मराठा व पेशवे
१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ झाली. मराठ्यांचे नेतृत्व छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या कडे होते . शिवाजी महाराजांना इ.स.१६७४ रोजी राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले.
शिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे भोसल्यांना औरंगझेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात पेशव्यांनी मराठा साम्राज्य हस्तगत केले. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले.बालाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव-१ यांनी मराठा राज्य वाढवले.
इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसरया लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालींनी पेशव्यांचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व अनेक स्थानिक राज्यात विभागणी झाली.
ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स.१७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युध्दे झाली. इ.स.१८१९ रोजी ब्रिटिशांनी मराठ्यांचे राज्य काबीज केले. महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपाआपले राज्य संभाळीत होते. मराठवाडा निझामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांना सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक या नेत्यानी ब्रिटिशांविरुध्द लढा उगारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई येथे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्वाचे केंद होते.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती
या विषयाचा विस्तृत लेख संयुक्त महाराष्ट्र चळवळ
भारताला इ.स.१९४७ रोजी स्वातंत्र्य लाभले.भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्यावरुन मराठी-जनात क्षोभ उसळला. अखेर १०५ जणांच्या बलिदानानंतर, १ मे १९६० ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याचा मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली.१९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागास एकत्र आणले.
भौगोलिक स्थान
महाराष्ट्र भारतीय उपखंडाच्या उत्तर-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनपठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राच्या समांतर सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मि. (७००० फुट) आहे. या पर्वतरांगातून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णा सह अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पुर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मान्सून पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.
प्रशासन
भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्याचा प्रमुख राज्यपाल ही व्यक्ती असते जी केंद्र सरकारने नेमून दिलेली असते. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. मुख्यमंत्री , राज्य सरकारचा प्रमुख, या व्यक्तीकडे सर्वाधिक अधिकार असतात. महाराष्ट्राची राजधानी, मुंबई असून येथे विधान सभा व मंत्रालय स्थित आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते.
महाराष्ट्रात दोन विधान-सदने आहेत. विधान सभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत मात्र अप्रत्यक्षरीत्या नियुक्त प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे राज्य सभेत १९ प्रतिनिधी तर लोक सभेत ४८ प्रतिनिधी असतात. भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय इतिहास मुख्यत: कॉंग्रेस पक्षाचा आहे. यशवंतराव चव्हाण, शरद पवार या काही महत्वाच्या कॉंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषविलेले आहे. परंतु १९९५ साली शिवसेना-भाजपा युतीने सत्ता काबीज केली. कॉंग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस हा नवा पक्ष बनवला. आज महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीची सत्ता असली तरी सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी हा आहे. विलासराव देशमूख हे मुख्यमंत्री तर आर.आर.पाटील हे उप-मुख्यमंत्री आहेत.
विभाग
महाराष्ट्र राज्य ३५ जिल्ह्यात विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा विभाग आहेत- औरंगाबाद, अमरावती, कोंकण, नागपूर, नाशिक व पुणे. हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.
भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: विदर्भ किवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), खानदेश व उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), देश किंवा पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग) आणि कोंकण (कोंकण विभाग).
महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २००१च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९,६७,५२,२४७ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारतातील दुस-या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणा-यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३२२.५/१ कि.मी.२ इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.०३ कोटी पुरुष व ४.६४ कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्राचे शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९२२ महिला इतका आहे. ७७.२७% (पु-८६.२%, स्त्रि-६७.५%) लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.
मराठी ही महराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्याचबरोबर हिंदी व इंग्रजी शहरी भागात बोलली जाते. उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात अहिराणी तर दक्षिण कोंकणात मालवणी या मराठीच्या बोलीभाषा बोलल्या जातात. दख्खनच्या देश भागात 'देशी' व विदर्भात 'व-हाडी' या बोलीभाषा अस्तित्वात आहेत.
राज्यात ८०.२% हिंदू, १०.६% मुस्लिम, ६% बौद्ध , १.३% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय जनता आहे. काही प्रमाणार ज्यू व पारशी धर्मीय देखिल आहेत.
अर्थव्यवस्था
पुढील तक्ता राज्याच्या वार्षिक उत्पन्नचा आहे. स्त्रोत सांख्यिकी मंत्रालय,भारत सरकार (आकडे- कोटी रु.)
वर्ष | वार्षिक उत्पन्न |
---|---|
१९८० | १६,६३१ |
१९८५ | २९,६१६ |
१९९० | ६४,४३३ |
१९९५ | १,५७,८१८ |
२००० | २,३८,६७२ |
७०च्या दशकातील योग्य आर्थिक धोरणांमुळे महाराष्ट्र भारतातील अग्रगण्य औद्योगिक राज्य बनला. परंतु महाराष्ट्रात विकास सारख्याप्रमाणात होऊ शकला नाही. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ, मराठवाडा व कोंकण हे भाग मागास राहिले. महाराष्ट्रातील राजकारणात व नोकरशाहीतही प.महाराष्ट्राचा अधिक प्रभाव आहे. विदर्भात असंतोष असून तेथील राजकारणी कधी कधी वेगळ्या राज्याची मागणी करतात.
राज्याचे २००४ सालचे वार्षिक उत्पन्न (gross state domestic product) $१०६ बिलियन आहे. महाराष्ट्र भारतातील दुसरा सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे.
महाराष्ट्र भारतातील अग्रगण्य औद्योगिक राज्य असून एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३% इतका राज्याचा हिस्सा आहे. ६४.१४% लोक कृषी व संबंधित उद्योगात रोजगार मिळवतात. एकूण वार्षिक उत्पन्नापैकी (GSDP) ४६% हिस्सा हा कृषी व संबंधित उद्योगातुन मिळतो.
- महाराष्ट्रातील प्रमुख उद्योदधंदे- रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलीयम आणि तत्सम उद्योग हे आहेत.
- इतर महत्वाचे उद्योदधंदे- धातु उत्पादने, वाईन, दागिने, औषधे, अभियांत्रिकी सामान,यांत्रिक सामान, पोलाद व लोह उद्योग, प्लास्टिक वायर्स
- महत्वाची पीके- आंबे, द्राक्षे, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्ये.
- महत्वाची रोख पीके (cash crops)- शेंगदाणे, कापूस, ऊस, हळकुंद व तंबाखू.
सिंचीत जमीन ३३,५०० कि.मी2 इतकी आहे.
मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जवळजवळ सर्व प्रमुख बॅका, आर्थिक संस्था, विमा संस्था व गुंतवणूक संस्थांचे मुख्य कार्यालये येथे आहेत. बॉलिवूड या हिंदी चित्रसृष्टीचे व मराठी दुरचित्रवाणी व चित्रपटांचे केंद्र मुंबईत आहे. मुंबई शेयर बाजार (भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना) ही महत्वाची संस्था मुंबईत आहे. महाराष्ट्र सरकारने सॉफ्टवेयर पार्क पुणे, मुंबई, नागपूर व नाशिक येथे स्थापन केले आहेत.
कोळसानिर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. जट्रोफा लागवडीसाठी महाराष्ट्राने नवा प्रयोग सुरु केला आहे.४१% पेक्षा S&P CNX 500 कंपन्यांचे महाराष्ट्रात कार्यालये आहेत.
संस्कृती
महाराष्ट्रातील काही मंदीरे शतकाहुन जुनी आहेत. मंदीरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारताचा मिलाप आढळतो. मंदीरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबाद जवळील अजिठा व एलोरा लेणी जगप्रसिध्द आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच बीबी का मकबरा येथे पहायला मिळेल. महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. रायगड, प्रतापगड व सिंधुदुर्ग ही काही उदाहरणे.
महाराष्ट्राचे लोकसंगीत समृध्द आहे. गोंधळ, लावणी, भारुड आणि पोवाडा हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. मराठी साहित्य भारतातील अग्रगण्य असे असून ज्ञानेश्वर (भावार्थदिपीका अर्थात ज्ञानेश्वरी चे रचेते), पु.ल. देशपांडॆ, प्र.के.अत्रे, व्यंकटेश माडगुळकर हे काही प्रमुख लेखक व कवी आहेत. प्रत्येक वर्षी अनेक मराठी पुस्तके प्रकाशीत होत असतात.मराठी नाटक, चित्रपट व दुरचित्रवाणीचे केंद्र मुंबई येथे आहे आणि बहुतेक कलाकार सर्व माध्यमातून कामे करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द व्यक्ति- पु.ल.देशपांडे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे आणि व्ही.शांताराम. मराठी नाटकातला जुना काळ लेखक कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोसकर यांनी गाजवला. तो काळ संगीत नाटके आणि नाट्यसंगीताचा होता. याच काळात बालगंधर्व, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनानाथ मंगेशकर या गायक-कलावंतानी रंगभूमीची सेवा केली.
मराठी दुरचित्रवाणी वाहिन्या पुढीलप्रमाणे- दुरदर्शन-सह्याद्री, झी मराठी व ईटीवी मराठी. मागील काही वर्षांपासून मराठी वाहिन्यांनी लोकप्रियता मिळवली असून बहुतेक वाहिन्या २४ तास सुरु असतात. परदेशस्थ मराठी माणसंदेखिल याचा अस्वाद घेतात.
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती भागानुसार बदलते. कोंकणच्या लोकांना भात व मासे आवडतात तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जते. सर्व प्रकारच्या डाळी, कांदे, बटाटे, टॉमेटो, मिरच्या, लसूण व आले हे पदार्थ महाराष्ट्रीयन जेवणात सर्रास वापरले जातात. सामिष अन्न अनेक जणांना आवडते.
मराठी स्त्रियांचा पारंपारिक वेष नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे. परंतु शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात. भारतातील इतर प्रांतांप्रमाणेच क्रिकेट हा खेळ येथेही लोकप्रिय आहे. कबड्डी सुध्दा खेळली जाते.लहान मुलांत विटी-दांडू, पकडा-पकडी हे खेळ लोकप्रिय आहेत.
दिवाळी, रंगपंचमी, गोकुलाष्टमी व गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत.पैकी गणेशोत्सव सर्वात मोठा व लोकप्रिय सण आहे जो आत देशभर साजरा केला जातो.दहा दिवस साजरा होणारा हा सण बुध्दी व विद्येचे दैवत गणपतीचा आहे. त्याचबरोबर शिव-जयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा इ. सण देखिल साजरे केले जातात.
वाहतूक व्यवस्था
भारतीय रेल्वेचे जाळे राज्यभर आहे व लांबच्या प्रवासाकरीता रेल्वे हे आवडते साधन आहे. महाराष्ट्राचा बहुतेक भागास मध्य रेल्वे सेवा पुरवते. कोंकण भागात कोंकण रेल्वे तर इतर काही भागात पश्चिम रेल्वे सेवा देते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) सेवा बहुतेक शहर व खेड्यात उपलब्ध असते. एस.टीचे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. विशेषत: ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत.अनेक शहरात एस.टी बरोबरच खाजगी गाड्यादेखिल सेवा पुरवतात.
महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईत आहे. नागपूर व पुणे विमानतळावर देशांतर्गत तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखिल होतात. औरंगाबाद, रत्नागिरी, कोल्हापूर व सोलापूर येथेही राष्ट्रीय विमानतळे आहेत.मुंबईतल्या बंदरांपासून कोंकण किनारपट्टीवरील इतर बंदरात फेरी-सेवा (पाण्यातुन वाहतुक) होत असते. उपनगरात सहाआसनी रिक्षा लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात महामार्गांचे मोठे जाळे आहे. मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग आहे. मुंबई-नागपूर मार्गाचे सध्या काम सुरु आहे.महाराष्ट्रातील ३ मोठे बंदर मुंबई, न्हावा-शेवा व रत्नागिरी हे आहेत.
मुख्य शहरे
- मुंबई-मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे.मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे.मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबईत परप्रांतीयांचे लोंढे कायम येत असतात कारण येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
- पुणे-शिवपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते.पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते.
- नागपूर-नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. विदर्भातील सर्वात मोठे शहर.
- औरंगाबाद-मराठवाडा विभागाचे मुख्यालय.मा.उच्च न्यायालयाचे खंडपिठ येथे आहे.
- नाशिक-सिंहस्थ कुंभमेळ्याचे नाशिक हे भारतामधील चार धामांपैकी एक शहर आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो.
- कोल्हापूर- महालक्ष्मी अंबाबाई मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे.
पर्यटन
या विषयाचा विस्तृत लेख महाराष्ट्र पर्यटन
महाराष्ट्र भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, व्यापारी अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे. प्रवासाच्या दृष्टीने चांगले लोहमार्ग, पक्क्या सडका, चांगली आणि स्वस्त क्षुधाशांतीगृहे, धर्मशाळा यांची इथे रेलचेल आहे.महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाने महाराष्ट्रातील पर्यटनव्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून डेक्क्न ओडिसी नावाची विशेष रेल्वे गाडी सुरु केली आहे. अजंठा लेणी, मुंबई, थंड हवेची ठिकाणे, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांना पर्यटकांची विशेष पसंती असते.
संदर्भ
बाह्यदुवे
Now isnt this article great? well I have taken it from mr.wikipedia.org and even helped building it :)